loader
Breaking News
Breaking News
Foto

अधिवक्ता परिषद कोकण प्रांताचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी): अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या वतीने संघटन व आउटरीच विभागाचा एकदिवसीय अभ्यासवर्ग शनिवारी, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी ज्ञानदीप लॉ कॉलेज (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रास्ताविक प्रांत संघटन उपाध्यक्षा प्रियाताई लोवलेकर यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एन. डी. देशपांडे आणि अ. भा. अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष परिमल पाठक (गोधरा, गुजरात) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने अभ्यासवर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण प्रांताचे महामंत्री श्रीराम रेडीज आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गव्हर्मेंट प्लीडर अंजलीताई हेळेकर यांनी मार्गदर्शन केले. अधिवक्ता परिषद क्षेत्रीय संघटन सचिव भालचंद्र महाजन, ज्येष्ठ प्रचारक शरद खाडिलकर, अधिवक्ता परिषद प्रांत संघटन सचिव श्रीराम ठोसरे (अलिबाग) आणि प्रांत आउटरीच उपाध्यक्ष अभिषेक गोगटे (देवगड) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे प्रथम क्रमांकाने निवडून आलेले सदस्य व माजी अध्यक्ष पारिजात पांडे यांनी देखील उपस्थित अधिवक्तांना मार्गदर्शन केले. कोकण प्रांताचे पालक दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासवर्गाचा समारोप झाला.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण अभ्यासवर्गाचे प्रमुख म्हणून अधिवक्ता सिद्धेश बुटाला यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अधिवक्ता अमेय मालशे यांनी केले. ज्ञानदीप लॉ कॉलेजचे प्राचार्य अधिवक्ता बागल यांनी अभ्यासवर्गाला मोलाचे सहकार्य केले. अधिवक्ता मिलिंद जाडकर आणि तालुका अध्यक्ष संगीता बापट यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अधिवक्ता प्रितेश जाधव, अधिवक्ता अक्षया सोमण गोडबोले, अधिवक्ता अनुजा राऊत, अधिवक्ता ऋग्वेद भावे, अधिवक्ता दिया देवळेकर, अधिवक्ता जितेंद्र बेलोसे आणि अक्षय दिवाळे यांनी परिश्रम घेऊन हा अभ्यासवर्ग यशस्वीरीत्या पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg