रत्नागिरी(प्रतिनिधी) - ‘‘केंद्रातील नरेंद्रांचे सरकार, राज्यातील देवेंद्रांचे सरकार आणि त्याच्या जोडीला जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर या जिल्ह्याचा विकास रथ वेगाने दौडू लागेल.. त्यासाठी महायुतीचे ज्येष्ठ नेते व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे हात आपण बळकट करायला हवेत.. म्हणूनच रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व पंचायतीमधील महायुतीच्या नगराध्यक्ष पदांच्या व नगरसेवक पदांच्या सार्या उमेदवारांना सर्व मतदार बंधूभगिनींनी एकजुटीने मतदान करुन त्यांना भरभक्कम मताधिक्क्याने विजयी करावे’’ असे भावनिक आवाहन भाजपाचे जिल्हा निवडणुक संयोजक ऍड. दिपक पटवर्धन यांनी केले आहे. येत्या नगर पालिका व नगर पंचायती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी आपली मते ठामपणे मांडली.
ऍड. दिपक पटवर्धन यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून यापूर्वी महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या शब्दाला भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फार मोठे वजन आहे. त्यांनी सांगितले, ‘‘केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे तर राज्यात फडणवीस सरकार आहे. त्याच्या जोडीला जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर या जिल्ह्याचा विकास रथ वेगाने दौडू लागेल.’’ ‘‘त्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री व भाजपा, शिवसेना महायुतीचे ‘सारथी’ ना. उदय सामंत यांचे हात आपण सर्वांनी बळकट करायला हवेत. या देवभूमीचा भक्कम विकास होण्यासाठी व येथील जनता जनार्दनाला बरकत येण्यासाठी आपल्या पालकमंत्र्यांना आपणच ‘बळ’ द्यायला हवे. येथील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची साथ मिळाली तर हा विकासचा रथ विलक्षण वेगाने दौडू लागेल यात शंका नाही’’ असे त्यांनी प्रतिपादन केले.
ऍड. दिपक पटवर्धन हे एक जिल्ह्यातील कर्तबगारी सिध्द केलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सुप्रसिध्द ‘स्वरुपानंद पतसंस्था’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, लहानसे रोपटे लावले आणि अथक परिश्रमाने त्या संस्थेचे प्रचंड वटवृक्षात रुपांतर करुन दाखविले. त्यांनी सांगितले की, ‘‘यावेळी भाजपा व शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार हे तरुण, तडफदार आहेत, सुसंस्कृत व सभ्य आहेत, कर्तव्यतत्पर व कर्तबगार आहेत आणि जनहितदक्ष व जनतेसाठी तळमळीने काम करणारे असेच आहेत.’’ ‘‘रत्नागिरी नगर पालिकेत भाजपा, शिवसेना महायुतीने नगर सेवक पदाच्या सर्वच्या सर्व ३२ जागांवर सुसंस्कृत व कर्तबगार उमेदवार दिले आहेत. तसेच रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, शिवसेना महायुतीच्या सौ. शिल्पा सुर्वे या उमेदवार आहेत. त्यांनी फाटक हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून लोकप्रियता संपादन केली. तसेच नगर पालिकेच्या दामले विद्यालयाला अवघ्या महाराष्ट्रात किर्ती मिळवून दिली. दामले विद्यालय ही सार्या महाराष्ट्रातील नगर पालिकेची एकमेव शाळा आहे की जिथे प्रवेश मिळावा म्हणून झुंबड उडते.. सौ. शिल्पा सुर्वे यांचा जनसंपर्क दांडगा आहे.. कर्तबगारी सिध्द केलेल्या त्या नेत्या होत’’ अशा मोजक्या शब्दात त्यांनी सौ. शिल्पा सुर्वे यांच्या कार्याचा गौरव केला. ऍड. दिपक पटवर्धन विलक्षण तळमळीने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘प्रदीर्घ काळानंतर रत्नागिरी नगर पालिकेला अशा अभ्यासू, सुसंस्कृत, कर्तबगार व जनसेवेसाठी तत्पर अशा नगराध्यक्षांचा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या रुपाने लाभ होणार आहे. मध्यंतरीच्या काळात रत्नागिरी न. प. मध्ये जो काही धांगडधिंगा सुरु होता तो यामुळे थांबेल आणि रत्नागिरी न. प. एक ‘सुसंस्कृत’ नगर पालिका म्हणून नावारुपाला येईल’’ अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. ऍड. दिपक पटवर्धन हे भाजपाचे जिल्हा निवडणुक संघटक म्हणून कार्य बजावीत आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘सुसंस्कृत, अभ्यासू व जनहित दक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांना सर्वांनी भरभक्कम मताधिक्क्याने विजयी करावे आणि अंतिम विजय हा सत्याचा होतो हे सर्वांनी प्रत्यक्षात दाखवून द्यावे. सौ. शिल्पा सुर्वे या रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वथैव सुयोग्य अशाच उमेदवार होत आणि रत्नागिरीचे भाग्य जोरावर असल्याने अशा सुयोग्य उमेदवार रत्नागिरीकरांना लाभल्या आहेत.. म्हणूनच सर्वांनी एकजुटीने त्यांना मतदान करुन मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे’’ असे त्यांनी सर्वांना भावनिक आवाहन केले.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.