loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त खेड शहरात भव्य स्वच्छता अभियान

खेड : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून खेड शहरातही या अभियानाचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत खेड शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसर आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये अग्निशामन कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार कार्यालय, मराठी शाळा क्रमांक 1, प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन परिसर, नगरपरिषद दवाखाना परिसर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर आणि त्याला जोडणारे प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यात येणार आहेत. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून स्वच्छ आणि सुंदर शहर घडवण्यासाठी तसेच समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या अभियानाचे विशेष महत्त्व आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत होणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने खेड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता संबंधित ठिकाणी उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे आणि या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. हा उपक्रम खेड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

प्रतिष्ठानचे व्यापक नियोजन; 1 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg