loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली - धनगरवाडी येथे जुगार क्लबवर कारवाई, मुद्देमाल जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) - दांडेली-धनगरवाडी येथे बंद घरात गेले कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या रमी जुगार वजा क्लब वर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकत धाडसी कारवाई केली. या कारवाईत ४५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ९ अँड्रॉइड मोबाईल, ८ दुचाकी, कुलर, वॉटर प्युरिफायर, जुगाराचे साहित्य मिळुन एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकुण अकरा जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या क्लबचा प्रमुख राजकुमार दिनकर कवठणकर याला ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो कित्येक महिन्यांपासून दांडेली-धनगरवाडी येथे रमी जुगार क्लब चालवत होता. ही कारवाई गुरुवारी रात्री दीड वा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांच्या पथकाने केली. यातील सर्व संशयितांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे या परिसरातील अवैध जुगार धंदे वाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अवैध धांद्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg