loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने, जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर यांनी सोमेश्वर पूलावरील खड्डे बुजवून रस्ता केला सुस्थितीत

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सोमेश्वर पुलावरील खड्डे पावसाळी डांबराने भरण्याचे काम करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नामदार उदय सामंत यांच्या आदेशान्वये आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ झापडेकर यांच्या विशेष सहकार्याने, देखरेखीखाली व नियोजनातून हे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्यात पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सवाच्या काळात पुलावरून होणारी वाढती वाहतूक लक्षात घेऊन खड्डे तातडीने बुजविण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामाच्या वेळी धडाडीच्या माजी सरपंच दिपश्रीताई पाटील, माजी सरपंच विनायक गावडे, माजी पंचायत समिती सदस्य बाबूशेठ मयेकर, मा. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पवार, शाखाप्रमुख राजेश हरचीरकर आणि युवा विभाग समन्वयक दिपक मयेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने सहकार्य करून सोमेश्वर पुलावरील खड्डे बुजवून दिल्याबद्दल महेंद्रशेठ झापडेकर यांचे परिसरातील नागरिकांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले. गणेशोत्सवात नागरिकांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी केलेल्या या तातडीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg