संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - तालुक्यातील कोंडीवरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत असलेल्या सफाई कामगार महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माखजन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास आता आयपीएस अधिकारी आरंक्षा यादव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने मंगळवारी उशिरा हा आदेश जारी केला. पीडित महिला गेली अनेक वर्षे शाळेत सफाईचे काम करते. तिच्या पतीची प्रकृती खराब असल्याने ती कुटुंबाची जबाबदारी पेलत आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी पैशांच्या वादातून व दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. शाळेच्या आवारात आरोपीने जातीवाचक शिवीगाळ, लज्जा वाटेल असे अपमानास्पद उद्गार व दगडफेक केल्याची घटना घडली होती.
संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७९, ३५२(२) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r) व ३(१)(w)(ii) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून शाळेतील शिक्षक, इतर सफाई कर्मचारी व गावातील काही साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. विशेष पथकाची निर्मिती करून कोकण परिसरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. फरार आरोपीचा मोबाईल बंद असल्याने ठावठिकाणा लागत नाही. घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बुधवारी कोंडीवरे गावात सर्व समाजाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. आरोपीला अटक झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर महंमद शेकासन यांनी निवेदन देत म्हटले आहे की, ’सफाई कामगारावर अत्याचार निषेधार्ह आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली आहे. संशयित आरोपी मुजीब माद्रे हा गेल्या काही वर्षांपासून कोंडीवरे परिसरात राहत असून, त्याच्यावर पूर्वीही किरकोळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सध्या तो फरार असून पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.