loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईहुन येणाऱ्या कोकण वासीयांसाठी मोफत चहा-नाश्त्याची मोफत सुविधा, मुंबई गोवा महामार्गांवर नायशी कोकरे फाटा येथे भाजपचा उपक्रम!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिपळूण तालुक्यातील नायशी कोकरे, कासे फाटा येथे गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या कोकणवासीय गणेश भक्तांच्या सेवेसाठी भाजपच्या मुंबईवासी नगरसेवक आणि नगरसेविका व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तर्फे मोफत चहा नाश्ता तसेच विश्रांती गृहाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उदघाटन दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उदघाटन कार्यक्रमाला भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, संतोष नलावडे, भाजपा इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाच्या संपर्क प्रमुख- कोकण, गोमाता संरक्षण समिती रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रसन्न जाधव, उदय घाग, मारुती होडे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून आपल्या गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान विश्रांती मिळावी, तसेच चहा- नाश्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. भाजपच्या या सेवाभावी उपक्रमाचे चाकरमान्यांसह स्थानिक ग्रामस्थांकडून स्वागत व कौतुक करण्यात आले. श्री गणरायाच्या कृपेने सर्व चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व मंगलमय होवो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg