वरवेली (गणेश किर्वे) - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, (महाराष्ट्र) यांच्यावतीने गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच हायस्कूल मधील विद्यार्थी, पालक आणि परिसरातील ग्रामस्थांशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, (महाराष्ट्र) संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे शुक्रवारी गुहागर दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, उपसभापती निलेश सुर्वे, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश कोळवणकर, सचिव सुधाकर चव्हाण, सुजाता चव्हाण, पाटपन्हाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संपदा चव्हाण, अनंत डिंगणकर, एडवोकेट प्रसाद जांगळे, ओमकार तिवरेकर, जिल्हाध्यक्ष एडवोकेट महेश मांडवकर, सचिव केदार चव्हाण, वैभव वेल्हाळ, पिंट्या वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले की, कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊचा ध्यास आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ही संस्था कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व स्तरावरील समाज घटकांसाठी सन २००८ पासून शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहे, कोकणातील तळागाळातील समाज चांगल्या आरोग्यापासून, शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे व पुढे जाऊन त्यांनी स्पर्धात्मक परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हावे हा उदात्त हेतू समोर ठेवून कोकणातील पाचही जिल्ह्यात ४८ स्पर्धा परीक्षा वाचनालय व अभ्यासिका ३८ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित आहेत. एवढेच नव्हे तर दरवर्षी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ३५ लाख वह्यांचे वाटप गावागावात वाड्या वस्त्यांवरती जाऊन केले जाते.
तसेच त्यादरम्यान ग्रामीण भागातील मुलांच्या करियर मार्गदर्शनाच्या विविध संधी व त्या संधीसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहे, ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट चे झडपोली जिल्हा पालघर येथे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण वर्गात तज्ञ मार्गदर्शनाद्वारे चालवले जातात, दिव्यांग मुलांची मोफत निवासी शाळा देखील निशुल्क चालवितात आहे, ३३ रुग्णवाहिका पाचही जिल्ह्यात मोफत सुविधा देत आहेत या सर्व प्रकल्पातून आजपर्यंत लाखो लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे, ५ हजारहून अधिक मुलांची शासकीय नोकरीत निवड झाली आहे विविध शासकीय पदांवर मुलांची निवड झालेले आहे पोलीस भरती व अग्निशामक दलात शेकडो मुलांची दरवर्षी निवड होत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.