loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दापोली पोलिसांची शांतता समितीच्या बैठकीत कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा

दापोली (वार्ताहर) - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलीस ठाण्याच्या वतीने ए. जी. हायस्कूलच्या कोकणे सभागृह येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पडावा, या उद्देशाने बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, ध्वनी प्रदूषणाला आळा घालणे तसेच नागरिकांनी सामाजिक सलोखा कायम ठेवणे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव काळात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या, नागरिकांच्या अपेक्षा तसेच उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आपली मते मांडली. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यावर भर देण्यात आला. बैठकीस शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, नगराध्यक्ष कृपा घाग, मुख्याधिकारी, विद्युत मंडळाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी मार्गदर्शन केले. ‘उत्सव आनंदाचा, जबाबदारी सर्वांची’ या भावनेतून दापोलीतील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg