loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. सदरच्या स्पर्धेत आयुष जाधव आणि ईश्वरी गोरे यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे त्यांची विभागीय स्तरावरील तायक्वाँदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच स्वरा चव्हाण हिने रौप्यपदक, तर सई चाळके, सई गोगावले, अनन्या मोहिते, रुद्र आदवडे, रुद्र राऊळ, आर्या कदम आणि आरोही तांबे यांनी कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण व प्रशिक्षक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg