loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवापूर्वी गुहागर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा....! मनसेचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील विविध प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर यांनी गुहागर नगरपंचायतीकडे निवेदन देत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सव हा गुहागर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा सण असून या काळात शहरात नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नगरपंचायतीने तातडीने कार्यवाही करून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी ठाम भूमिका जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी गांधी साहेब , मनसे उ. जिल्हाध्यक्ष मनिष पाथरे, उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर यांच्या मार्गदर्शनात मनसे शहराध्यक्ष अभिजीत रायकर यांनी मांडली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg