loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शीतपेयांची जास्त दराने विक्री, संबंधितांवर कारवाई करा, ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग शाखेची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुध, पाणी या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शीतपेये यांची ‘कुलिंग चार्ज‘ नावाखाली छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक व लुबाडणूक सुरू आहे. ग्राहकाला छापील किंमतीला वस्तू मिळणे हा त्याचा हक्क डावलून काही विक्रेते उघडपणे फसवणूक करीत आहेत. अशा विक्रेत्यांची तपासणी करून त्यांना समज द्यावी, पुन्हा फसवणूक केल्यास योग्य कार्यवाई करा, अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या निवेदनाची प्रत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिली आहे. ग्राहकांना छापील किंमतीने वस्तू मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्याबाबत जिल्ह्यात अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे संबंधित यंत्रणेचे काम आहे. त्यासाठी केवळ एखाद्या विक्रेत्यावर कारवाई करून चालणार नाही, तर संबंधित प्रशासकीय यंत्रणेद्वारे आणि प्रसार माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असून त्याबाबत कार्यवाही करणेच्या सूचना सर्व संबंधिताना द्याव्यात तसेच व्यापारी महासंघ यांच्याशी चर्चा करावी, अशी विनंती जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व सचिव संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

सदरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र सुकटे यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक-विष्णूप्रसाद दळवी, सिंधुदुर्गनगरी अध्यक्ष- श्रीराम चव्हाण, संघटक- सूर्यकांत पाटील, कुडाळ अध्यक्ष- प्रदीप शिंदे व सचिव प्रा.अजित कानशिडे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg