loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणचा ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ राष्ट्रीय पटलावर, डॉ. ज्योती तोरसकर यांच्या संशोधनाची राष्ट्रीय परिसंवादात दखल

मालवण : (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्यापूर्वी ज्या ठिकाणी किल्ल्‌याची पायाभरणी केली असे मालवण दांडी- वायरी किनार्‍यावरील ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ या शीलास्थळाविषयी मालवण मधील इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा- तोरसकर यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिसंवादात संशोधनपर लेखाचे सादरीकरण केले. यामुळे सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासातील आजवर व्यापक चर्चेपासून काहीसे दूर राहिलेले, मात्र ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘मोरयाचा धोंडा’ हे शिलास्थळ प्रथमच व्यापक राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे सिंधुदुर्गाच्या इतिहासाकडे केवळ लष्करी किंवा स्थापत्याच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक आणि सागरी राज्यनिर्मितीच्या व्यापक संदर्भातून पाहण्याची नवी दिशा या संशोधनातून समोर आली, असे डॉ. तोरसकर यांनी सांगितले. या निमित्ताने या स्थळाच्या पुढील ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी नवी दारे खुली झाली असून, सिंधुदुर्गाच्या सागरी वारशाच्या अभ्यासाला राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg