loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यायालयीन कामकाजात अचूक लेखन आणि प्रभावी युक्तिवाद हेच वकिलाच्या यशाचे गमक : ऍड. श्रीकृष्ण ओगले

सावंतवाडी, (प्रतिनिधी)- न्यायालयीन कामकाजात अचूक मसुदा लेखन आणि प्रभावी युक्तिवाद हेच कोणत्याही वकिलाच्या यशाचे खरे गमक असते, असे प्रतिपादन कायदेतज्ञ ऍड. श्रीकृष्ण ओगले यांनी केले. सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात गुंफण्यात आले. या व्याख्यानात ‘ड्राफ्टिंग आणि प्लिडिंग’ या विषयावर वेंगुर्ला येथील प्रसिद्ध वकील ऍड. श्रीकृष्ण ओगले हे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. न्यायालयात खटला दाखल करताना ड्राफ्टिंग किती स्पष्ट, कायदेशीर मुद्द्यांना धरून आणि संक्षिप्त असावे, याचे तंत्र ऍड. ओगले यांनी विविध उदाहरणांसह समजावून सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्यायालयात खटला दाखल करताना ड्राफ्टिंग किती स्पष्ट, कायदेशीर मुद्द्यांना धरून आणि संक्षिप्त असावे, याचे तंत्र ड. ओगले यांनी विविध उदाहरणांसह समजावून सांगितले. न्यायाधीशांसमोर आपला पक्ष मांडताना कायद्याचे ज्ञान आणि भाषेवरील प्रभुत्व कसे वापरावे, यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वकीलवर्ग व विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. प्रिया सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. बाळाजी रणशूर यांनी मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg