loader
Breaking News
Breaking News
Foto

पैसा फंडच्या बालकलाकारांनी साकारल्या बाल गणेश मूर्ती

संगमेश्वर (प्रतिनिधी) - व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या इयत्ता पाचवी मधील बाल कलाकारांनी आपल्या चिमुकल्या हातानी शाडू मातिमध्ये एकूण २४ बाल गणेशाच्या मूर्ती हाती तयार केल्या. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका निशा निमले यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे व्यापारी पैसा फंड संस्थेने कौतुक करुन संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी या बाल कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवात अग्रस्थानी असते ती गणेश मूर्ती ! या गणेश मूर्तीची रचना कशी असते, याची निर्मिती कोणत्या मातीत केली जाते, हाती मूर्ती घडविताना कोणती साधनं वापरली जातात ? याची बालवयात बाल कलाकारांना अनुभूती यावी या हेतूने पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर मधील इयत्ता पाचवी मधील सर्व मुलांनी शाडू माती मध्ये बाल गणेशाच्या सुबक मूर्ती आपल्या चिमुकल्या हातानी साकारल्या. यासाठी वर्गशिक्षिका निशा निमले यांनी सर्व बाल कलाकारांना मार्गदर्शन केलं. तब्बल दोन तास विद्यार्थी आपल्या चिमुकल्या हातानी आणि कल्पक बुद्धीने गणेश मूर्तीला आकार देण्यात तल्लीन झाले होते. प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी बाल कलाकारांना सहकार्य केलं.

टाईम्स स्पेशल

व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी या गणेश मूर्ती तयार करण्याच्या उपक्रमाला प्रत्यक्ष भेट देवून सर्व बालकलाकार आणि मार्गदर्शक शिक्षिका निशा निमले यांचे अभिनंदन करुन कौतुक केले. पैसा फंड प्रशाला कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. शाडू मातीत गणेश मूर्ती घडविणे हा त्याचाच एक भाग होता. व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष मूर्तिकार किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदिनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिका निशा निमले यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg