loader
Breaking News
Breaking News
Foto

आमची भगिनी आर्थिक सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे - निलेश भगवान सांबरे

आबलोली (संदेश कदम) - माझ्या सर्व भगिनींना मी नमस्कार करतो. आपण जिजाऊ संस्थेमार्फत गेले 28 वर्ष प्रयत्न करतोय की, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे तसेच आपल्या समाज बांधवांना उत्तम आरोग्यही मिळाले पाहिजे. गेल्या दहा-बारा वर्षापासून नुसतं टीव्ही बघून, मोबाईलच्या मागे लागून रिकामपणे या ओटीवरून त्या ओटीवर जाणाऱ्या भगिनींपेक्षा आमची भगिनी आर्थिक सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी केले. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांचे आबलोली गावाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिजाऊ संस्थेचे निलेश भगवान सांबरे पुढे म्हणाले की, आमच्या भगिनीला आजारपणासाठी पैशासाठी मुलाकडे किंवा नवऱ्याकडे हात पसरावे लागतात. आमची भगिनी मार्केटमध्ये गेली एखादी वस्तू तिला आवडली तर तिला कोणतीही अडचण येऊ नये मुलगी, मुलगा, नवरा पैसे देतो की नाय. पैशामुळे तिचा स्वाभिमान कुठेतरी मनापासून दुखावला जायचा. पैसे मागितले तर ती घरात किती काम करते याचं मोजमाप कोण करत नाही सकाळी सर्वांसाठी लवकर उठणारी माझी भगिनी आणि सर्वात लेट झोपणारी प्रत्येकासाठी त्याची आवड निवड जपणारी, आजारपणात काळजी घेणारी ती प्रत्येकाला आवडणाऱ्या भाज्या चपात्या आणि भाकऱ्या बनवायचं जेवण बनवायचं प्रत्येकाच्या आजारपणात काळजी घ्यायची पण तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनंत अडचणी येतात. महागाई वाढते मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतोय आरोग्यवस्थेचा खर्च करतो अशा दोन्ही बाजूला बघताना तिचा स्वाभिमान जपायला हवा ते स्वाभीमानाने जगली पाहिजे अशा दृष्टीने महिला सक्षमीकरण नावाचे काम जिजाऊ संस्थेमार्फत हाती घेतले आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही माझ्या भगिनींना आर्थिक सक्षम करणारच असा निर्धार जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निलेश भगवान सांबरे पुढे म्हणाले की, देशाच्या राष्ट्रपती महोदया आमच्या भगिनी आहेत. उद्योग व्यवसायातील आमच्या भगिनी उच्च पदावर पोहोचल्या पाहिजेत शिक्षणात ही आपल्या भगिनी पुढे आहेत यूपीएससी मार्फत जे अधिकारी नियुक्त होतात. पालघर जिल्ह्यामध्ये डांबोरी अल प्रकल्प आहे. तिथे देशांमध्ये दुसरी आलेली आपली भगिनी प्रकल्प अधिकारी म्हणून दोन दिवसापूर्वी नियुक्त झाली देशांमध्ये आज भगिनी पुढे येत आहेत रेल्वे चालवायला लागल्या आहेत विमान चालवत आहेत मग आमच्या रत्नागिरी मधल्या भगिनीं मुलांकडे, नवऱ्याकडे हात न पसरता त्या मुलांना नवऱ्याला पैसे देणाऱ्या झाल्या पाहिजेत. परवा ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात येथे गेलो तेथे महिला बचत गटाने 1958 साली शाळा काढली आजही महिला बचत गट ती शाळा चालवतात कुठच्याही शिक्षकाला पैसे न देता स्वतःचे योगदान स्वतः देतात आणि शाळा चालवतात. मला उद्या रत्नागिरीत तशी शाळा निर्माण करायची आहे त्यासाठी निधी आपण निर्माण करू आणि आमच्या भगिनी या शाळा सांभाळतील याची मला खात्री आहे. आई पेक्षा संस्कार देणारी कुणीच नसतं प्रत्येक विद्यार्थी हा अब्दुल कलाम साहेब किंवा लालबहादूर शास्त्री म्हणून घडला पाहिजे हा माझा विश्वास आहे असे स्पष्ट मत जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगवन सांबरे यांनी व्यक्त करून.आबलोली येथे महिलांना प्रशिक्षणासाठी मोफत जागा देणाऱ्या सचिन कारेकर यांचाही निलेश भगवान सांबरे यांनी गौरव केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी विचारपीठावर जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, महाराष्ट्र राज्याचे सचिव केदार चव्हाण, उद्योजक वसंतदादा उदेग, पोलीस पाटील महेश भाटकर, सरपंच वैष्णवी नेटके, गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर, जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते ऍड. प्रसाद जांगळे ओमकार तीवरेकर, अनंत डिंगणकर यांचेसह बचत गटाच्या सीआरपी तसेच बचत गटांच्या महिला आणि निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी बाबुराव सूर्यवंशी तसेच जिजाऊ संस्थेचे अमरजी राऊत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg