loader
Breaking News
Breaking News
Foto

भांबेडमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भांबेड गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ११ सप्टेंबर रात्री ८ वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांबेड पेठदेव येथे उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी नवयुवक उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ (भांबेड पेठदेव) तसेच कोर्ले राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (कोर्ले) यांच्यासह भांबेड परिसरातील एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री गणेशमूर्तीच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या विविध जबाबदाऱ्या, उत्सवादरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ठरणाऱ्या अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या आचारसंहितेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा उत्सव असून, सर्व मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून उत्सव आनंदी, शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg