वावे-दिवाळी, इंदापूर — गौतम जाधव : माणगाव मध्येअखिल बुरुड समाज प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माणगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला भव्य बुरुड समाज मेळावा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी मानस बँक्वेट हॉल, माणगाव येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार तथा समाजभूषण मा. किशोरभाऊ जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माणगावसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने बुरुड समाज बांधव या मेळाव्यास उपस्थित राहिले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक एकजूट, शैक्षणिक प्रगती आणि गुणवंतांचा सन्मान या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणून छत्री देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नववीतील विद्यार्थ्यांसह उच्चशिक्षित तरुण विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.समाजाच्या उन्नतीसाठी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या नगरसेवक, उद्योजक आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या मेळाव्यास उद्योजक मा. सदानंद गायकवाड (उरण) तसेच उद्योजक व निवृत्त पोलीस सहाय्यक अधीक्षक मा. प्रदीप माने (पनवेल) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, पनवेल, ठाणे, खेड, चिपळूण, दापोली तसेच रायगड येथून आलेल्या समाज बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष मा. आबासाहेब पवार, महासचिव मा. प्रकाश माने, खजिनदार मा. राजेंद्र नागे, जिल्हा प्रमुख मा. संदिभाई नागे आणि तालुका प्रमुख मा. संदेश महाले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, हा भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक प्रमुख डॉ. अजय आत्माराम मोरे, महिला आघाडीच्या सौ. अंकिता अजय मोरे तसेच त्यांच्या सहकारी टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे मेळाव्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले.समाजाची एकजूट, शैक्षणिक प्रगती आणि नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा संदेश देणारा हा मेळावा बुरुड समाजाच्या सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.