loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुकास्तरीय १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सानिका अमित ठाकूर (इयत्ता ११वी विज्ञान) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षिता महेश तारी (इयत्ता ११ वी वाणिज्य) हिने चतुर्थ क्रमांक व भावेश रामचंद्र कुबल (इयत्ता ११ वी विज्ञान) याने तृतीय क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीने तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg