चौक, (अर्जुन कदम) टाइम्स ऑफ इंडिया आणि AM/NS यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय तार्किक विचार चाचणी परीक्षेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडवळ येथील विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या तीन विद्यार्थिनींची नवी दिल्ली येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली असून, खालापूर तालुक्या सह जिल्ह्यात सर्वत्र या मुलींचे कौतुक होत आहे.
शाळेत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन फेऱ्यांमध्ये या चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक असलेल्या दुसऱ्या फेरीत शाळेतील कु.स्नेहा सचिन कदम (इ. ७ वी), कु. वैष्णवी रघुनाथ चाळके (इ.७ वी) आणि कु.वीरा प्रवीण मरागजे (इ. ६ वी) या तीन विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवत राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.सदर गुणवंत विद्यार्थिनींच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका जयश्री राजाराम सुर्वे या दिल्ली येथे रवाना होणार आहेत. येत्या १६ सप्टेंबर रोजी हे पथक दिल्लीसाठी प्रस्थान करेल. नवी दिल्ली येथील 'प्रधानमंत्री संग्रहालय' येथे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीतील चाचणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ पार पडणार आहे.
या यशासाठी खालापूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजवर्धन नाईक व पोषण आहार अधीक्षक दीपा परब, देवन्हावे केंद्राच्या केंद्रप्रमुख सुकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी सर्व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावणारे मुख्याध्यापक सुधाकर थळे, विषयशिक्षिका जयश्री सुर्वे, उपशिक्षिका करुणा बोंबे,हर्षा काळे व उपशिक्षक नारायण बोडेकर यांनी या विद्यार्थिनींच्या यशासाठी विशेष मेहनत घेतली.ग्रामपंचायत वडवळचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या आणि पालकांच्या वतीने या चिमुकल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला असून दिल्लीतील अंतिम फेरीत यश मिळवण्यासाठी सर्वांकडून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. *गट शिक्षण अधिकारी राजवर्धन नाईक यांनी सांगितले, AM/NS-TF TCTC 2026 स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील तार्किक विचार चाचणी परीक्षेत खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ आणि जिल्हा परिषद शाळा नारंगी येथील गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी झालेली निवड ही संपूर्ण तालुक्यासाठी व शिक्षण विभागासाठी अत्यंत भूषणावह बाब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता आणि तार्किक विचारक्षमता सिद्ध करत आहेत, ही गोष्ट ग्रामीण भागातील शिक्षणाचा वाढता दर्जा अधोरेखित करणारी आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे अपार कष्ट, त्यांना योग्य दिशा देणारे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मार्गदर्शक तसेच पालकांचे मोलाचे योगदान आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.