loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका तेली समाजबांधवांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर युवा समिती आयोजित फक्त गुहागर तालुक्यातील तेली समाजबांधवांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती श्री गणेशाचे सजावटीचे फोटो पाठवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर तसेच विजेता घोषित करण्याची तारीख २७ सप्टेंबर आहे. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तु व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. स्पर्धेत फक्त गुहागर तालुक्यातील तेली समाजातील परिवारास सहभाग घेता येईल. ही स्पर्धा घरगुती गणपती पूजन करणार्‍यांसाठी आहे. प्रत्येक स्पर्धकाने त्यांच्या गणपती सजावटीचे २ फोटो समोरून व १ फोटो गणपती सजावटीच्या समवेत कुटुंबातील व्यक्तींसोबत काढून खालील व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावेत. चलचित्र देखावा असल्यास व्हिडीओ पाठवावा. फक्त १ मिनिटाचा व्हिडीओ असावा. माहिती साठी आणि फोटो पाठवण्यासाठी व्हॉट्सऍप क्रमांक समाधान रहाटे ७३८७६९२५३५ - संजीव रहाटे, ८३९०८८५८३८ - रुपेश किर्वे, ९४०५८७९९६८ - शुभम लांजेकर, ९१४६१३४०४६ - स्वपनील झगडे ९४२११३८३४३ इथे संपर्क साधावा असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg