सावंतवाडी (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहराच्या शिरोडा नाक्या हद्दीनंतर कारिवडे हद्द येथे सलग दुसऱ्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि युवराज लखमराजे भोसले यांच्या पुढाकारातून ही मोहीम हाती घेण्यात आली असून, यात लोकप्रतिनिधी, सावंतवाडी कृती समितीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कारिवडे हद्दीवर साचलेल्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी तीव्र खंत व्यक्त केली. हे दृश्य अत्यंत गंभीर असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची सवय बदलावी, असे आवाहन त्यांनी केले. नगरपालिका व स्वच्छता कर्मचारी रोज सफाई करू शकतात, मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय शहर कायमस्वरूपी स्वच्छ राहू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी नागरिकांना पुढील महत्त्वाच्या सूचना व आवाहन केले.
मुख्य प्रवेशद्वार अथवा सार्वजनिक मोकळ्या जागी कचरा टाकणे पूर्णपणे बंद करावे. घरामध्येच ओला व सुका कचरा वेगळा करून तो कचरा संकलन कर्मचाऱ्यांकडे द्यावा. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा. तासन्तास श्रम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि मेहनतीचा आदर करावा. सावंतवाडी ही आपली ओळख व अभिमान असून स्वच्छता ही केवळ एक मोहीम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले. या मोहिमेत स्थानिक पदाधिकारी, कृती समितीचे सर्व सदस्य आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.