loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत अमेय शहानुर तायक्वांदो क्लबचे उत्तुंग यश

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२६ आंबेडकर भवन राजापूर या ठिकाणी दिनांक १० व ११ सप्टेंबर २६ रोजी संपन्न झाल्या. शालेय तायक्वांदो स्पर्धेत अमेय शहानुर तायक्वांदो क्लब सावर्डे चिपळूणच्या क्लब मधील दहा खेळाडू स्पर्धकांनी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील तीन खेळाडू ऋतूज मते, गंधर्व धने, समर्थ राजेशिर्के यांनी आपले विशेष प्राविण्य दाखवून सुवर्णपदकाचे मानकरी ठरले असून, सहा खेळाडू दर्शन कदम, स्वर घाग, मयुरेश लाड, प्रद्युम्न सुवरे, दिक्षा लाड, आराध्या चव्हाण रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत, तर श्रीपाद धुरी कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे. या दैदीप्यमान यशासाठी अमेय शहानुर तायक्वांदो क्लब सावर्डेचे प्रशिक्षक भरत कर्रा, प्रशिक्षक रुद्र जंगम प्रशिक्षक ऋतूज मते यांनी या खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या यशाबद्दल अमेय अकॅडमीच्या संचालिका वृषाली नांदिवडेकर, सर्व पालक वर्ग, सावर्डे ग्रामस्थ यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व राज्य स्पर्धेसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg