loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड, तारामुंबरी येथे १४ ते २५ सप्टें. रोजी दुर्मिळ देशांतर्गत नाणी, नोटांचे प्रदर्शन

देवगड (प्रतिनिधी ) - देवगड तारामुंबरी या गावचे सुपुत्र विजय हिरोजी खवळे यांच्या देशांतर्गत नाणी व नोटांचा संग्रहाचे प्रदर्शन दिनांक १४ ते २५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. विजय खवळे हे म.ना.पा शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी स्वकर्तृत्वावर विद्यार्थीप्रिय शिक्षक, कबड्डी प्रशिक्षक, तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून आपली ओळख निर्माण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रदर्शन हे अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार असून यामध्ये १५ ऑगस्ट १९४७ पासून आजपर्यंतच्या नाणी नोटांचा समावेश असून १९४७ नंतर आर.बी.आय. व यू.एन.सी. नाणी नोटा त्याप्रमाणे २२० देशांची नाणी, नोटा विविध प्रकारची रंगीत नाणी, नोटा व पोस्टाची तिकीटे भारतातील जुनी संस्थानं व जुनी राजांची नाणी, भारतीय प्राचीन काळ मौल्यवान व दुर्मिळ नाणी, इंग्रज काळातील टोकन, कॉंईस, नोटा, नाणी तसेच जगातील सर्व जुन्या काळातील देशांचे राजचिन्हे, झेंडे, एकंदरीत ३०० देशाच्या नाणी नोटा, पोस्ट तिकीट पाहणे शक्य होणार आहे.

टाइम्स स्पेशल

हे सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रदर्शन दि. १४ ते २५ सप्टेंबर रोजी स्थळ- शिवबा सदन, श्री खवळे महागणपतीच्या शेजारी, तारामुंबरी येथे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत आयोजित केले आहे. तरी आपण खवळे महागणपतीचे दर्शन घ्या, पण शिवबा सदन मध्ये आयोजित मोफत भव्य व दिव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आणि संयोजक विजय खवळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg