रत्नागिरी (जमीर खलफे) : गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील (U-14) टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर दिमाखदार विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला धुळ चारली आणि मानाची ट्रॉफी आपल्या नावे केली. या ऐतिहासिक विजयात रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल’च्या दोन होतकरू आणि गुणी खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला आहे. अनय शेट्ये आणि चैतन्य शेट्ये या दोन बालक्रिकेटपटूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना मैदानावर दाखवलेले कौशल्य, संयम आणि धडाकेबाज कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे वर्चस्व राहिले.
एका ग्रामीण भागातील आणि स्थानिक शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी थेट राज्यस्तरीय संघात स्थान मिळवून संघाला विजेतेपद मिळवून देणे, ही संपूर्ण सैतवडे गावासाठी, शाळेसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. अनय आणि चैतन्य यांच्या या यशामुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ. रहिम माद्रे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळा परिवाराच्या वतीने अनय शेट्ये व चैतन्य शेट्ये यांचा विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
त्याचप्रमाणे घुमटकर ग्रुप तर्फेही दोन्ही खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. अनय आणि चैतन्य यांनी अशीच उत्तुंग कामगिरी कायम ठेवत भविष्यात शाळेचे, सैतवडे गावाचे आणि संपूर्ण रत्नागिरीचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या यशाने परिसरातील इतर बालखेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.