loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेश भक्तांसाठी कळंबोली वाहतूक शाखेचा विशेष बंदोबस्त; वैद्यकीय सेवा, क्रेन, पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग तैनात

कळंबोली : गणेशोत्सवात मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाकडे कळंबोली सर्कल मधून मार्गस्थ होत असतात. गणेश भक्त व वाहनांची मोठ्या प्रमाणावर असलेली संख्या लक्षात घेता नेहमीच होणारी वाहतूक कोंडी व त्यातून होणारा नागरिकांना त्रास याकरिता वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतूक विभाग यांच्या वतीने विशेष वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कळंबोली सर्कल येथे या उत्सवाच्या दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडीशी सामना गणेश भक्तांना करावा लागतो. गणेश भक्तांचा आपल्या गावाकडे जातानाचा प्रवास सुखमय सुरक्षित व आनंद मिळवावा, यासाठी कळंबोली वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे यांनी विविध उपयोजना करण्यात आल्याचे सांगितले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सह पोलीस आयुक्त योगेश गावडे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कळंबोली वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली वाहतूक विभागाच्या हद्दीत विशेष वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या विशेष बंदोबस्तामध्ये कळंबोली वाहतूक विभागातील 03 अधिकारी व 35 अंमलदार, तसेच बाहेरील बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालय, नवी मुंबई येथील 10 महिला अंमलदार व 10 पुरुष अंमलदार, बेलापूर स्ट्राइकिंग फोर्सचे 08 अंमलदार, 35 ट्रॅफिक वॉर्डन (सक्षम कंपनी) तसेच 04 एमएसएफ जवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कळंबोली परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळणे, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे चौक, जंक्शन व वाहतूक संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

वाहतूक व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असून, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.गणेशभक्त व वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे तसेच प्रवासादरम्यान संयम बाळगावा, असे आवाहन कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी टाळता यावी आणि कोकणाकडे जाणारी वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी 1 रुग्णवाहिका, कार मेकॅनिक, बॅटरी मेकॅनिक, हायड्रा क्रेन, साधी क्रेन उपलब्ध करून दिली असून सर्कल मध्ये 24 तास पोलीस मार्गदर्शन, अनाऊन्समेंट उपलब्ध करून दिलेली आहे या प्रकारे कळंबोली वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन व बंदोबस्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg