loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे देवरुख येथे विशेष आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत वाशी तर्फे देवरुख आणि आरोग्य उपकेंद्र वाशी तर्फे देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचा ६१ ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी ग्रामस्थांची हिमोग्लोबिन (HB), रक्तदाब (BP), रक्तातील साखर, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच विविध असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय रक्त तपासण्या, HB/CBC तपासणी, नेत्र तपासणी व मोतिबिंदू रुग्णांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. किटकजन्य व जलजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठीही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शिबिराला ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, तसेच दिलीप कडू, लक्ष्मी सावंत, मनिषा कांबळे, सायली सावंत, मधुकर करंडे, नटे, रेवंती सावंत, दर्फे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता पवार यांनी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक अशोक बोरसे, आरोग्य निरीक्षक प्रशांत अहिरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी मेघा टोंगे, लॅब टेक्निशियन सानिका गुरव, सिस्टर सुपल, आरोग्य सेविका प्रिया साडीम, आरोग्य सेवक संतोष आगरे, सुमेद यादव व विजय राऊत, आशा सेविका मनिषा सावंत, प्रणिका लिंगायत व तृप्ती विभुते, अंगणवाडी सेविका सुप्रिया सावंत तसेच लायन्स आय हॉस्पिटलचे तात्या सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विविध आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याचे चित्र या शिबिरातून दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg