loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांच्या पतसंस्थेची २६ वी वार्षिक सभा उत्साहात

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ​सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव किशोर जयसिंग रावराणे यांनी सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर सभेचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ही संस्था सहकारी पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना कर्ज रूपाने आर्थिक सहकार्य करून सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि ती आर्थिकदृष्ट्या अधिक भक्कम करण्यासाठी तिचे कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत वाढवण्याचा मानस अध्यक्ष सुनील राऊळ यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पतसंस्थेच्या वाढीसाठी सभासदांनी ठेवी, आवर्त ठेवी व बचत ठेवी वाढवून सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. ​सभेचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष जेम्स बॉर्जिस यांनी मानले, तर अध्यक्ष सुनील राऊळ यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg