loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात जान्हवी पाटील जिल्ह्यात द्वितीय; विभागस्तरासाठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विद्यार्थी एकत्र यावेत, त्यांच्या विचारांचे मंथन व्हावे आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या द्वारे शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यातर्फे दि. ८ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे ‘जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आयोजित जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा ’वक्तृत्व स्पर्धेत’ राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इयत्ता १० वीतील विद्यार्थिनी जान्हवी विश्वास पाटील हिने ’भारतीय ऊर्जाक्षेत्रे २०४७ - संधी आणि आव्हाने’ या विषयावर उत्कृष्ट वक्तृत्व सादर करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ यांनी जान्हवीचे अभिनंदन करून तिला पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg