loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

खेड, (प्रतिनिधी) - दिनांक १० सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील जी. जी. पी. एस. इंग्लिश मिडिअम स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २०२६ - २७ मध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वेश श्रीकांत दामले याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ओजस नितीन गुहागरकर याने पाचवा क्रमांक मिळवला. सर्वेश श्रीकांत दामले व ओजस गुहागरकर यांची दिनांक २६ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ सांगली येथे होणार्‍या विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांना क्रीडाशिक्षिका सौ. शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष .डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg