मालवण (प्रतिनिधी) - निवती लाईट हाऊस समुद्र परिसरात पर्यटन नौका वाहतूकीस बंदी करण्यात आल्याने याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती पदाधिकारी तसेच जलसफर व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेत या प्रश्नी लक्ष वेधले. यावेळी लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा होऊन लवकरच मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या प्रश्नी तोडगा काढला जाईल असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिल्याने जलसफर व्यवसायिकांना दिलासा दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीने आम. निलेश राणे यांना निवेदन सादर केले. निवती लाईट हाऊस जलवाहतूक सफरीचा व्यवसाय अनेक वर्षांपासून शासनाचे सर्व नियम पाळून, लाईफ जॅकेट व आवश्यक सुरक्षा साधनांसह सुरू आहे. प्रशासनाने येथील जलसफरवर काही नियमांचा ब्रेक लावल्यामुळे स्थानिक रोजगारावर तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार असून व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. हा व्यवसाय सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन आहे. असे असताना निवती लाईट हाऊस व म्हातारीची चुळ परिसरातील जलसफरीवर प्रशासनाने काही नियमानुसार ब्रेक लावला आहे. प्रशासनाचा आक्षेप आहे की, या बोटी ‘इनलँड व्हेसल्स (IV) ॲक्ट’ अंतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांना पाच नॉटिकल मैलांच्या पुढे जाता येत नाही.
मात्र, निवती लाईट हाऊसची जलसफर ही खोल समुद्रातील मासेमारी साठीचा प्रवास नसून ४५ ते ६० मिनिटांचा पर्यटन फेरा आहे, त्यामुळे IV Act मधील तरतुदीनुसार या परिसराला ‘Special Tourism Zone’ म्हणून अधिसूचित करून पाच नॉटिकल मैलांच्या अटीतून शिथिलता द्यावी. कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत जलसफारी पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी. नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुलभ करावी, MMB व DOT यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याबाबत अवगत करावे. या प्रश्नाकडे आमदारांनी लक्ष घालावे तसेच पालकमंत्री तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामार्फत बंदर विभागाला योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी समितीने केली. याबाबत स्थानिक बंदर अधिकारी यांच्याशी आमदार निलेश राणे यांनी चर्चा केली. जलसफर व्यावसायिकांच्या समस्या लक्षात घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. गणेश चतुर्थी उत्सवानंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती प्रतिनिधी यांनाही या बैठकीत निमंत्रित केले जाईल, सदर विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून जलसफर व्यावसायिकांना दिलासा मिळवून दिला जाईल, असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले. तसेच चर्चेअंती काही प्रश्न तात्काळ सोडविण्यात आल्याने जलसफर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रश्नी सकारात्मक चर्चा होऊन व्यवसायिकांना दिलासा मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती सदस्यांनी आणि पर्यटन व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले, असे पर्यटन व्यवसायिकानी सांगितले. यावेळी बाबली चोपडेकर, बाबा मोंडकर, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती अध्यक्ष मनोज खोबरेकर, उपाध्यक्ष प्रतिक कुबल, सचिव नागेश सारंग, खजिनदार सतिश टिकम, बाबली चोपडेकर, सहदेव साळगावकर, रामा चोपडेकर, रमेश कद्रेकर, संजय केळुसकर, गोरक्ष पराडकर, सुरज भोसले यांच्यासह देवबाग, तारकर्ली, कोचरा, निवती, भोगवे येथील जलपर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.