loader
Breaking News
Breaking News
Foto

"आता किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” - महामार्गावरील अपघातांवरून संतापाचा उद्रेक; उपाययोजना करा, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा!

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे भीषण अपघात, वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या रात्री लोटे येथे झालेल्या अपघातात एका कुटुंबाचा आधारवड गमावल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.आहे.“जीव गेल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा, जीव जाण्यापूर्वीच ठोस उपाययोजना करा,” असा आक्रोश युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने करण्यात आला आहे.गेल्या रात्री झालेल्या अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती ही आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होती. त्यांच्या पश्चात लहान मुली आणि गर्भवती पत्नी असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. एका निष्पाप कुटुंबाचा संसार उध्वस्त झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासन आणखी किती जीव गेल्यानंतर जागे होणार, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.गणपती उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणात लाखो चाकरमानी दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत महामार्गावरील वाहतूक प्रचंड वाढणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

*१. वाहतूक नियोजनाचा बोजवारा* *२. धोकादायक वळणांवर सुरक्षा व्यवस्थेचा अभाव* *३. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि रिफ्लेक्टर नाहीत* *४. रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त वावर* “जनावरांचे जीवही महत्त्वाचे आहेत आणि माणसांचे जीवही. दोन्हींचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी संघाने केली आहे. या सर्व प्रश्नांबाबत लवकरच उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.*“आता केवळ आश्वासने नकोत; नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृती हवी. जर तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर पोलीस प्रशासन, संबंधित शासकीय यंत्रणा आणि महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयांसमोर हजारोंच्या संख्येने जनआंदोलन उभारू,”* असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष *बाळा खेडेकर*, सादिक काझी, खेड तालुका अध्यक्ष मिलिंद जाधव, उपाध्यक्ष वैजुद्दिन परकार, आनंद पवार, जलाल कादरी, वहीद कडवेकर, बशीर मुजावर, साई खेडेकर, अहमद परकार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg