कळंबणी, खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजनजीक रात्री भीषण अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणारी दुचाकी क्र. जीजे २१ बीआर ४८६९ आणि विरुद्ध दिशेने राँग साईडने येणारी दुसरी दुचाकी क्र. एमएच ०८ बीए ९३७३ यांच्यात कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांवरील तिघे जण रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात लक्ष्मण राम धोत्रे (वय ३२) - रा. लातूर, सध्या रा. कळंबणी, चंद्रकांत दत्ताराम अग्रे (वय ३१) - रा. वीर, चिपळूण, किरण कृष्णा कलके (वय २९) - रा. वीर, चिपळूण आदी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ड्युटीवर जात असलेले होमगार्ड जवान नवनाथ घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतकार्य सुरू केले.
त्याचवेळी भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास अपघात मदतीसाठी मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तिन्ही जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. गेल्या २४ तासात खेड-चिपळूण पट्ट्यात हा तिसरा अपघात असून, राँग साईडने येणार्या गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नाणीजधाम रुग्णवाहिका सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.