loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील बहिरवली गणातील आमशेत ते सवणस मोहल्ला रस्त्याची दुरावस्था, नागरिकांत तीव्र नाराजी

खेड, (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील बहिरवली गणातील आमशेत ते सवणस मोहल्ला या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याची अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्यावरील खड्डे अद्याप भरले गेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मंजूर रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला? असा सवाल उपस्थित करत संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे खाडीपट्टा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि मंजूर डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg