loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन; रेल्वे, गाड्या फुल्ल

​सावंतवाडी : गणेशोत्सव सणासाठी नोकरीनिमित्त शहरात राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल होत आहेत. कोकण रेल्वेमार्गासह एसटी बस आणि खासगी वाहनांना प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रेल्वेने जादा फेऱ्या सोडल्या आहेत. ​सणाच्या निमित्ताने वर्षभर बंद असलेली अनेक घरे उघडली असून, त्यामुळे गावांमधील वातावरण गजबजून गेले आहे. दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंद लुटल्यानंतर हे नागरिक पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील. सध्या तरी सावंतवाडीसह संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साह दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg