loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत एलटीटी स्कूलने मारली बाजी

खेड (प्रतिनिधी) : खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेड या प्रशालेने क्रीडा व युवक संचनालय, पुणे महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी तसेच खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व खेड तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. ९ सप्टेंबर रोजी मुकादम हायस्कूल, खेड येथे पार पडलेल्या ’तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धे’मध्ये अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १४ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये कु. दक्ष कमलेश चव्हाण, तर मुलींमध्ये कु. मीरा दीपक गुडेकर, कु. झारा इरफान रुमाने, कु. स्वरा सुनील शेठ, १७ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये कु. श्रेय उत्तम पाटणे तर मुलींमध्ये कु. अनुष्का नरेश पेडामकर, कु. अस्मिता वसंत भुसारे, १९ वर्षाखालील वयोगटातील मुलींमध्ये कु. अलीना अब्दुल मन्नान मुल्लाजी यांनी बुद्धिबळातील ’चपळता व डावपेच’ या कौशल्यांचा अचूक वापर करत विजयावर आपली मोहोर उमटवली. त्यांनी दाखवलेल्या शानदार खिलाडीवृत्तीने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg