खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्था, गुणदे व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान गुणदे यांच्या संयुक्त विद्यमाने सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुरुकुल विद्यामंदिर, मातोश्री अनुसया (माई) आंब्रे स्मार्ट स्कूल, गुणदे (मम्मास) या तिन्ही प्रशालांचे अस्सल कोकणी रानमेवा व खाद्यपदार्थांचे लक्षवेधी प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशपूजन, सरस्वतीपूजन व गुरुपूजन करण्यात आले. तर डाऊ केमिकलचे सेवानिवृत्त वैद्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर आंब्रे यांच्या हस्ते रानभाज्या व कोकणातील खाद्य पदार्थ दालनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध रुचकर रानभाज्या व खाद्य पदार्थ मांडण्यात आले होते. यामध्ये तांदूळ, नाचणीचीभाकरी, उकडीचेमोदक, कानवले, अळूवडी, कोथिंबीरवडी, घावणे, आंबोळी, खीर, सोलकढी, खमंगभ, अळूची भाजी, टाकळा भाजी, भारंगी भाजी, अळंबी अशा विविध कोकणी रानभाज्या व पदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले होते. सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रांत आंब्रे, व्हा. चेअरमन अरविंद आंब्रे, सचिव राजेंद्र आंब्रे, शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर आंब्रे तसेच लोटे एमआयडीसीमधील लिंबोरे, नंदकुमार जाधव साहेब व सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी, गुरुकुल विद्यामंदिर, गुणदेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिता विचारे यांनी प्रदर्शनातील विविध पदार्थांची पाहणी केली व विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सर्व पदार्थांचा आलेल्या पाहुण्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे खूप कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर नंदकुमार जाधव व लिंबोरे यांच्या वतीने प्रशालेतील स्टीलचे रेलिंग व पोर्च समोरील पत्रा शेड लावून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल, नारळ व पुष्पगुछ्ह देऊन सत्कारित करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रांत आंब्रे यांनी समाधान व आभार व्यक्त केले. तसेच डाऊ केमिकलचे सेवा निवृत्त वैद्य यांनी आपल्या भाषणामध्ये रानभाज्यांचे महत्व व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प्रशालेतील विज्ञान शिक्षक शैलेश आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तयारी केलेला प्रशालेचा प्रतिभावान विध्यार्थी सोहम कृष्णा साळवी याचा तालुका स्तरीय विज्ञान मेळावा मध्ये द्वितीय क्रमांक व जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व या करिता मान्यवरांचे हस्ते त्याला सत्कारित करण्यात आले.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.