सावर्डे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील आऊटसोर्सिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य आऊटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उद्योजक व ठेकेदार श्री. सचिन भाऊसाहेब कोल्हापुरे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावर्डे परिसरासह चिपळूण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य आऊटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राज्यस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. राज्यभरातील आऊटसोर्सिंग क्षेत्राशी संबंधित ठेकेदार, संस्था प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. बैठकीदरम्यान संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून संघटनेचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळणारे श्री. सचिन कोल्हापुरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांची पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्यभरातील विविध शासकीय विभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ पुरविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या, एजन्सी, ठेकेदार, बेरोजगार सहकारी संस्था आणि इतर सेवा पुरवठादार यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य आऊटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टर संघटना करते. राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त असलेली ही संघटना ठेकेदारांच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करत असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत आहे.संघटनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असून विविध शासकीय कार्यालये, विभाग आणि संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. या क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न, निविदा प्रक्रिया, कामगार कल्याण, वेतन विषयक बाबी आणि ठेकेदारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. श्री. सचिन कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने गेल्या दशकात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या समन्वयक वृत्ती, संघटन कौशल्य आणि प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ठेकेदारांमध्ये विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत राज्यभरातील सदस्यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.
या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह राज्यभरातील ठेकेदारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.