loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

दापोली (वार्ताहर ) : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत ए जी हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित व शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत वड, जांभूळ, आवळा, शिसम, साग यांसह सुमारे 40 देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. स्थानिक जैवविविधता जपण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निवास देसाई, डॉ. विजय गुरव, तसेच या योजनेचे इतर सदस्य डॉ. पूनम पानस्कर आणि अथर्व महाजन यांनी उपक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी गटप्रमुख श्रेयश लवरे, प्राची सकपाळ आणि ऋत्वी टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील एकूण 150 विद्यार्थी स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एक विद्यार्थी – एक वृक्ष, एक वृक्ष – एक भविष्य या भावनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे जालगाव परिसरात हरित पट्टा निर्माण करण्यास हातभार लागणार असून, एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg