loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे सुपुत्र अशोक सकपाळ यांची बीड लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील तळे गावचे सुपुत्र अशोक सकपाळ यांची उबाठा शिवसेना बीड लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक सकपाळ यांनी राजकिय शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात के लेले कार्य उल्लेखनीय असून, समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवीत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक उपक्रम, राजकिय जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर बीड लोकसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे. तळे या ग्रामीण भागातून पुढे येत शैक्षणिक व सामाजिक राजकिय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशोक सकपाळ यांच्यावर आता बीड लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक जबाबदारी आली आहे. पक्षाची भूमिका आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg