loader
Breaking News
Breaking News
Foto

‘रानमाया २०२६’मध्ये ४५ हून अधिक रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांचे अनोखे प्रदर्शन

दापोली (वार्ताहर) : कोकणच्या समृद्ध निसर्गपरंपरेत आढळणार्‍या विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता आणि त्यापासून तयार करता येणार्‍या नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने रामराजे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुप्रतिक्षित ‘रानमाया २०२६’ या रानभाज्यांपासून बनविलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे प्रदर्शन यंदाही दापोलीकरांच्या पसंतीस उतरले. या प्रदर्शनासाठी ‘नाणीचो वाडो’ कृषी पर्यटन, कुडाळ, सिंधुदुर्गचे संस्थापक स्मितेश तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थितांनी विविध रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल ४५ हून अधिक रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ. यामध्ये भारंगी, टाकळा, कुरडू, कारटोली, चिचाडी, मायाळू, रताळ्याची पाने, प्याव, दार, कुड्याच्या शेंगा, शतावरी, थरबरा यांसह कोकणात आढळणार्‍या विविध रानभाज्यांचा समावेश होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg