loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात यंदा 1 लाख 69 हजार 664 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, सर्वत्र मंगलमय वातावरण!

रत्नागिरी टाइम्स डिजिटल डेस्क : अवघे तीन दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे.गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी कोकणात सर्वत्र गावागावातून सुरू आहे, यंदा रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला एक लाख 69 हजार 538 घरगुती गणपती आणि 126 सार्वजनिक गणपती अशा एकूण एक लाख 69 हजार 664 गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गतवर्षी 2025 पेक्षा यावर्षी घरगुती गणपतीमध्ये 112 नी वाढ झाली आहे .सार्वजनिक गणपती मध्ये घट किंवा वाढ झाली नसून ती गतवर्षी इतकीच आहे .गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असून घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. कुणाच्या घरी दीड दिवसाचा, कुणाकडे पाच दिवस गौरी गणपतीपर्यंत तर काहीजणांकडे अनंत चरसुती पर्यंत तर काही जणांकडे आणखी 21 दिवसांचाही गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात गावागावात प्रचंड उत्साह असतो, काही ठिकाणी नवसाचा ही गणपती सहा महिने घरात पूजेसाठी ठेवला जातो .घरच्या गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात .घरोघरी मंगलमय वातावरणात भक्तीपूर्ण वातावरण मध्ये गणपतीची पूजा केली जाते. गावकरी एकत्र येऊन आरती करतात , अनेक ठिकाणी अंगणात सार्वजनिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. गणेशोत्सवात जाखडी नृत्यकला मोठ्या प्रमाणात कोकणात ठिकठिकाणी दिसून येते. रात्रीच्या वेळी जाकडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण वाढत आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील 126 सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत .त्यामुळे टिळकळीतील 101 वर्षाचा इतिहास असलेला पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव, बंदर रोड मित्र मंडळाचा गणेशोत्सव, लाल गणपती, त्याचबरोबर रत्नागिरी नगरपरिषद कर्मचारी मंडळ, भूमी अभिलेख, जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक रुग्णालय, विशेष कारागृह, शहर पोलीस ठाणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.रत्नागिरी शहरात यंदाही रत्नागिरीचा राजा आणि श्री रत्नागिरीचा राजा या दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे भव्य कार्यक्रम व आयोजन सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg