loader
Breaking News
Breaking News
Foto

पेवे खरेकोंड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. सचिनमहाराज साळवी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पेवे खरेकोंड या गावचे सुप्रसिद्ध किर्तनकार, श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर व आळंदीचे विश्वस्त ह.भ.प. सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेर्डी यांच्या सयुक्त विद्यमाने सन्मानीत करण्यात आले. संत शिरोमणी गोरोबा काका सभागृह सौरभ चेम्बर्स दुसरा मजला चिपळूण - कराड रोड वरची पेठ खेर्डी ता. चिपळूण येथे चिपळूण तालुका कुंभार समाज अध्यक्ष व चैतन्य हॉटेलचे मालक प्रकाशशेठ निवळकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कार प्राप्त किर्तनकार ह. भ. प. सचिनमहाराज साळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर फड श्री. क्षेत्र पंढरपूर. आळंदी या फडाचे मी वारकरी असून गेली चौवीस वर्ष किर्तन व भजन प्रवचन क्षेत्रात सेवा करत आहेत. कोकण तसेच घाटमाथा परिसरामध्ये त्यांनी किर्तन प्रवचन सेवा केली आहे.सन्मान हा केवळ शाल -पुष्पाचा नसतो तो आपल्या सेवेची मिळालेली प्रेमळ पोचपावती असते. प्रकाश निवळकर यांच्या हस्ते माझा झालेला हा सन्मान आमच्या साठी केवळ कौतुकाचा क्षण नाही तर आधिक निष्ठेने आधिक ताकदीने आधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg