loader
Breaking News
Breaking News
Foto

राजकारणासोबत समाजसेवेचा आदर्श; भाजपचे उदय घाग यांच्याकडून कर्णबधिरांसाठी श्रवण यंत्रांचे वाटप

चिपळूण (प्रतिनिधी) : कर्णबधिर नागरिकांच्या जीवनात संवादाचा नवा प्रकाश आणण्यासाठी भाजपा चिपळूण तालुका ग्रामीणचे तालुकाध्यक्ष उदय घाग यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गरजू नागरिकांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. ग्रामीण भागातील कर्णबधिर नागरिकांना कुटुंबीयांशी संवाद साधता यावा, दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ढोक्रवली, दहिवली, खरवते, सावर्डे यांसह विविध गावांतील गरजू नागरिकांना आतापर्यंत श्रवण यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘सेवा हीच खरी समाजकारणाची ओळख’ या भावनेतून काम करत असल्याचे उदय घाग यांनी सांगितले. गरजू घटकांसाठी आरोग्यविषयक तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर तसेच भाजपा चिपळूण तालुका ग्रामीण अध्यक्षा वैष्णवी राजे शिर्के यांचे सहकार्य लाभत आहे. कर्णबधिरांच्या जीवनात ‘ऐकण्याचा आनंद’ निर्माण करणाऱ्या उदय घाग यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, हा सेवाभावी उपक्रम ग्रामीण भागातील अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg