loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयाची श्रेया मोरे हिची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

बुरंबी (संगमेश्वर) - येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी–शिवने प्रशालेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रेया संजय मोरे हिने देवरूख येथे झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. १७ वर्षे वयोगटातील ४२ ते ४४ किलो वजनी गटात श्रेयाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ही निवड संपादन केली. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रेयाच्या यशाबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शरद गोविंद बाईत, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर व सर्व, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “ध्येय मोठे ठेवा, मेहनत नक्की यश मिळवते!” या संदेशाला सार्थ ठरवत श्रेयाने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg