loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवात येणार्‍या चाकरमान्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ४ पथके तैनात

वैभववाडी (प्रतिनिधी) - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे येथून तालुक्यात दाखल होणार्‍या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैभववाडी तालुक्यातील रेल्वे स्टेशन, भुईबावडा चेक नाका, करुळ पोलीस तपासणी चेक नाका तसेच वैभववाडी बसस्थानक या चार ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी करुळ पोलीस तपासणी चेक नाका येथे भेट देऊन वैद्यकीय पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चाकरमान्यांना आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सौ. साची कोलते, सरपंच नरेंद्र कोलते, माजी उपसरपंच सचिन कोलते, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, आरोग्यसेविका धनश्री देसाई, आरोग्य सेवक खाडे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत सावंत, राहुल कनाके आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg