loader
Breaking News
Breaking News
Foto

जतीन करंगुटकरची जलतरण विभागीय स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) - क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गतर्फे क्रीडा संकुल जलतरण तलाव, ओरोस येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय ५० मी. बॅकस्ट्रोक या जलतरण क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी जतीन संतोष करंगुटकर यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे जतीन हा विभाग स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जतीन याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg