loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-हर्णे-आंजर्ले मार्गाची दुरवस्था; सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष, अपघाताला आयतेच निमंत्रण, परिस्थिती बदलणार कधी?

दापोली (प्रतिनिधी) : सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा दापोली हर्णे आंजर्ले केळशी मार्गावर गिम्हवणे हद्दीत सुराली गार्डन हॉटेलनजिक खड्डेच-खड्डे पडले आहेत. अहोरात्र वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर पडलेला खड्डा कोणता चुकवायचा आणि कोणत्या खड्ड्यातून वाहन न्यायचे याची तारेवरची कसरत करतच वाहने वाहन चालकांना हाकावी लागत आहेत. यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे तरी सुद्धा ढिम्म बांधकाम प्रशासन बघ्याचीच भुमिका निभावताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील दापोली आसुद हर्णे आंजर्ले आडे उटंबर केळशी मांदिवली मार्गे मंडणगडकडे जाणारा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर हर्णे मासेमारी बंदर, पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, कडयावरचा गणपती मंदिर, याकुबबाबा सर्वरी दर्गा, केळशी येथील महालक्ष्मी मंदिर, वाळूची टेकडी, मुरुड कर्दे बिच आदी महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. दापोली तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावर दापोली येथील महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात गिम्हवणे येथून हाक मारली तर ती ऐकू जाईल, असे हाकेच्या अंतरावरील दापोली शहराला लागूनच असलेल्या गिम्हवणे गावाच्या हद्दीतून जाणार्‍या मार्गावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे हे माहीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांना साधे रस्त्यातील खड्डे बुजवून मार्ग वाहतूकयोग्य करून घेता येत नाही. हे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांचे खरेच दुर्दैव आहे.

टाईम्स स्पेशल

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गिम्हवणे येथील खड्डे बुजवून सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्ग वाहतूक योग्य करता येत नसेल तर अन्य मार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती काय ? असेल याचा विचारच न केलेला बरा. दापोलीतील सर्वच ठीकाणच्या रस्त्यांची एकुणच परिस्थिती सुधारण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला आतापर्यंत सपशेल अपयश आले आहे. यापुढे गणेशोत्सव वगैरे सण उत्सव लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि वर्दळीच्या रस्त्यांची सुधारणा करून ते सुस्थितीत करुन रस्त्यावर अपघात होणार नाही आणि सुरळीतपणे वाहतूक सुरू राहण्याकडे अधिक दक्ष दिले गेले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg