loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख-लांजा मार्गावर शिवशाही बस सोडल्याने प्रवाशांना डबल भाडे, एसी गाड्यांमुळे काचा बंद, एसीही बंद प्रवाशांमध्ये संताप

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख आगारातून सुटणार्‍या आणि लांजा मार्गावर धावणार्‍या देवरुख लांजा या साध्या बस चालवणे गरजेचे असताना या मार्गावर शिवशाही ए.सी. बंद असलेल्या बस पाठवून प्रवाशांकडून डबल भाडे वसूल केले जात असून प्रवाशांना होणार्‍या त्रासाने प्रवासी वर्गात संतापाची लाट उसळली असून होणारी सामान्य जनतेची होणारी लूट देवरुख आगारप्रमुखांनी त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे. देवरुख-लांजा ही बस साखरपा मार्गे दाभोळ मार्गे लांजामध्ये जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही साधी बस सोडून कमी पैशात प्रवाशांना प्रवास करता येईल, मात्र अधिक पैसे कमावण्यासाठी देवरुख आगार प्रमुख या मार्गावर बंद ए.सी. असलेली गाडी पाठवत आहेत. गुदमरलेल्या अवस्थेत अधिक भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याबाबत देवरुख आगार प्रमुखांनी ए.सी. बंद, काचा बंद शिवशाही गाडीतून एक दिवस प्रवास करून बघावं म्हणजे प्रवाशांना काय त्रास होतो याची कल्पना येईल.

टाईम्स स्पेशल

पूर्ण काचा बंद असलेल्या बसमधून अधिक प्रवासभाडे देऊन होणारा मानसिक त्रास याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे. देवरुख आगार प्रमुखांनी याबाबत त्वरित देवरुख-लांजा मार्गावर धावणारी एस.टी. बस साधी पाठवावी व प्रवाशांना होणार्‍या त्रासापासून वाचवावे, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg