loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत धर्मवीर आनंद दिघे यांना भावपूर्ण आदरांजली; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन

सावंतवाडी - धर्मवीर आनंद दिघे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी येथील माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या 'श्रीधर अपार्टमेंट' येथील संपर्क कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहर प्रमुख आणि नगरसेवक बाबू कडतरकर यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर आनंद दिघे अमर रहे' आणि 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे' अशा जोरदार घोषणा दिल्या.

टाईम्स स्पेशल

या अभिवादन सभेला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, माजी नगरसेविका भारती मोरे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, विश्वास घाग, संदेश सोनुर्लेकर, गुंडू जाधव, कृष्णा लाखे, लतिका सिंग, सायली होडावडेकर, संजय मांजरेकर, महेश शिरोडकर, एकनाथ हळदणकर, सुभाष गावडे, सुप्रीता धारणकर, सुनील नाईक सुरेश सावंत संजय माजगावकर आणि भारती परब यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg